चिपळूण
दोन दिवसांपूर्वी शिवडी-मुंबईतून आलेल्या होमक्वारंटाईन असलेल्या शिरगाव येथील 39 वर्षीय तरूणाचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृतयू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही विशेष खबरदारी घेत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बुधवारी मध्यरात्री लघुशंकेसाठी उठला असता त्याच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. तालुका आरोग्याधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी सहकाऱयांसह भेट दिली. यावेळी संबंधित तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सर्व प्रकारची खबरदारी घेत या तरूणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तरूणाच्या पश्चात आई, वडील, पत्नी व 4 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.