प्रतिनिधी/ बेळगाव
होमगार्ड विभागाचे कमांडंटविरुद्ध पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. मोरब (ता. रायबाग) येथील आलमशा नदाफ व इतरांनी ही तक्रार केली आहे.
बेळगाव जिह्याचे कमांडंट किरण नायक यांनी आपल्याला शिवीगाळ करून होमगार्ड पदावरून काढून टाकले आहे. होमगार्डमध्ये भरती करण्यासाठी आर्थिक व्यवहार करण्यात आला आहे. यासंबंधी चौकशी केल्यानंतर आपल्याला शिवीगाळ करीत काढून टाकण्यात आले आहे. यासंबंधी योग्य कारवाई करावी, अशी मागणी आलमशा व इतरांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.