बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक विधानपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी जद (एस) एमएलसी बसवराज होरट्टी यांना भाजपने पाठिंबा दिला आहे. तर कॉंग्रेसचे नसीर अहमद यांनीही अधिकृत अधिसूचनेनुसार आज अर्ज दाखल केला आहे.
मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी आणि एम. टी. बी. नागराज यांच्यासह भाजपा आणि जद (एस) एमएलसी यांच्या उपस्थितीत होरट्टी यांनी परिषद सचिवांकडे अर्ज दाखल केला, तर अहमद यांनी काँग्रेस आमदारांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
सत्ताधारी भाजपाने सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रतापचंद्र शेट्टी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर ही निवडणूक लागली. यासाठी जेडीएस आणि भाजप एकत्र येत निवडणूक लढविण्याचा विचार केला.
होरट्टी यांचा विजय निश्चित असून यासाठी भाजपचा पाठिंबा आहे. तर विरोधी कॉंग्रेसने स्पर्धा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अहमद यांना उमेदवारी दिली आहे.