18 मार्चला चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त जाहीर झाला आहे. अक्षयने स्वतःच याची माहिती सोशल मीडियावर दोन नवे पोस्टर्स शेअर करत दिली. ‘ऍक्शन, कॉमेडी, रोमांस, ड्रामा-लोडिंग थिस होली’. साजिद नाडियादवालांचा ‘बच्चन पांडे’ 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय’ असे अक्षयने म्हटले आहे. निर्मात्यांनी यापूर्वी हा चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता.
फरहाद सामजी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार या चित्रपटात अक्षय कुमारसमवेत जॅकलीन फर्नांडिस आणि क्रीति सेनॉन दिसून येणार आहे. तसेच चित्रपटात पंकज त्रिपाठी, प्रतीक बब्बर, सहर्ष शुक्ला आणि अभिमन्यू सिंह यासारखे कलाकार विविध भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमार हे ओह माय गॉड 2 या चित्रपटामध्sयही एकत्र दिसून येणार आहेत. चालू वर्षात अक्षयचे पृथ्वीराज, रक्षा बंधन आणि राम सेतू हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.