प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी चेकपोस्ट नाके करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. सोमवारी रात्री रामदुर्ग तालुक्मयातील होसकेरी चेकपोस्ट नाक्मयाजवळ एका कारची कसून तपासणी केली असता त्या कारमधील काही जणांकडे 6 लाख रुपये रक्कम सापडली. ती रक्कम जप्त करण्यात आली आहे.
सदर रक्कम सुरपूर तालुक्मयातील केंभारी गावातील एका व्यक्तीची असून सध्या ती रक्कम जप्त करण्यात आली आहे. एसएसटी पथकाने ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेली ती रक्कम जिल्हा पंचायत सीईओ यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीकडे सुपूर्द करण्यात आली. सोमवारी रात्री चौकशी करण्यात आली त्यावेळी योग्य प्रकारे संबंधितांनी उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे आता या रकमेबाबत सर्व कागदपत्रे देण्यात आली तर ती रक्कम संबंधितांना परत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.