प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाकाळात जीवाची पर्वा न करता सतत कार्यरत असणाऱया कोरोना योद्धय़ा माया दोड्डमनी व कोविड तपासणी करणाऱया 12 कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. होसूरमधील महानगरपालिकेच्या दवाखान्यात हा कार्यक्रम झाला. तेथील डॉक्टर्स, नर्स व आशा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
मध्यंतरी हा दवाखाना बंद होता. माजी नगरसेवक सुधा भातकांडे यांनी प्रयत्न करून हा दवाखाना सुरू केला. कोविड काळात याचा अनेक नागरिकांना उपयोग झाला आहे. नागरिकांना मोफत उपचार मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका सुधा भातकांडे, रतन सैनुचे, अनुराधा जाधव, रेखा शहापूरकर, मालू शहापूरकर, आरती जाधव, पूजा जाधव, निकिता मनवाडकर, अलका शहापूरकर, माधवी अष्टेकर, लक्ष्मी भातकांडे, गीता जाधव, अश्विनी हलगेकर, सोनाली कणबरकर, प्रशांत भातकांडे व युवक उपस्थित होते.