वृत्तसंस्था/ मुंबई
स्मार्ट मोबिलीटी सोल्युशनसंबंधीची देशातील पहिली ऑटो क्षेत्रातील कंपनी हय़ुंडाई मोटर इंडिया यांनी हय़ुंडाई सुव्ह (SUV) लाइफची नवी मोहिम सुरू केली आहे.
देशातील सुव्ह गटातील मोटार निर्मिती करणारी आघाडीवरची कंपनी म्हणून हय़ुंडाईची ओळख आहे. सुव्ह गटात कंपनीने क्रेटा, वेन्यु, अल्काझार, टुस्कॉन आणि कोना इलेक्ट्रिक या मोटारींना सादर करत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. कंपनीच्या विक्री, विपणन आणि सेवा विभागाचे संचालक तरुण गर्ग म्हणाले, सध्याच्या आधुनिक जीवनशैलीला हय़ुंडाईच्या सुव्ह गटातील कार्स अधिक आनंददायी अनुभव ग्राहकांना देत आहेत. देशातील नंबर एकचा ब्रँड म्हणून सुव्ह गटात उल्लेख कंपनीचा होतो. ग्राहकांचे यासंबंधीचे आनंददायी अनुभवही जाणुन घेतले जात आहेत. यासंदर्भात वाहिलेले एक वेबपेजही हय़ुंडाई सुव्हकडून सुरू होणार असल्याचे ते म्हणाले. ‘लेकर हम दिवाना दिल’ या गाण्याच्या थीमची साथ घेत नवी मोहिम आखली आहे. हे गाणे लाखो ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी तामिळ, कन्नड, मलयालम व कन्नड या भाषांमध्येही तयार करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.