वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी हय़ुंडाई मोटर इंडियाच्या ऑगस्टमधील कार विक्रीत 19 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. कंपनीने ऑगस्ट 2020 मध्ये 45 हजार 809 वाहनांची विक्री केली आहे. ऑगस्टमधील वाढीचा कंपनीला चांगला दिलासा मिळाला असून आता कंपनीने येणाऱया उत्सवी काळासाठी योजना आखली आहे.
याच तुलनेत मागच्या वषी ऑगस्टमध्ये कंपनीच्या 38 हजार 205 गाडय़ा विकण्यात आल्या होत्या. स्थानिक बाजारात कंपनीच्या गाडय़ांची विक्री बऱयापैकी वाढली असल्याचे सांगण्यात येते. मागच्या वषीच्या तुलनेमध्ये या खेपेस मात्र निर्यातीत मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. ऑगस्ट 2020मध्ये कंपनीने मात्र 6 हजार 800 वाहनांची निर्यात केली आहे. मागच्या वषी ती याच कालावधीत 17 हजार 800 इतकी होती. अनलॉकनंतर आता व्यवहार सुरळीत होत असून ऑटो क्षेत्राला गती घेण्यासाठी संधी उपलब्ध झाली असून येणाऱया काळात विक्रीत आणखी वृद्धी अपेक्षीत आहे.