वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी हय़ुंडाई मोटर इंडियाने सप्टेंबर महिन्यात वाहन विक्रीमध्ये 3 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. कंपनीची सप्टेंबरमधली एकत्रित कार विक्री 59 हजार 913 इतकी होती. या तुलनेत मागच्या वषी याच महिन्यात कंपनीने एकत्रित 57 हजार 705 गाडय़ा विक्री केल्या होत्या.
कंपनीने यावषी सप्टेंबरमध्ये 50 हजार 313 गाडय़ा विक्री केल्या आहेत. मागच्या वषी याच महिन्यात 40 हजार 705 गाडय़ांची विक्री केली होती. दरम्यान कंपनीची निर्यात 43 टक्क्मयांवर राहिली आहे. मागच्या वषी सप्टेंबरमध्ये 17000 गाडय़ांची निर्यात कंपनीने केली होती. या तुलनेमध्ये गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये 9 हजार 600 गाडय़ांची निर्यात केली होती. निर्यातीत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.
युटिलीटी व्हेईकल गटात अव्वल
हय़ुंडाईने युटिलीटी व्हेईकल गटात उत्पादन करण्यात अव्वलता प्राप्त करण्यास यश मिळवलं आहे. सुव्ह गटात कंपनी आघाडीवर असून सप्टेंबर 2020 मध्ये क्रेटा या गाडीने विक्रीतला उच्चांक प्राप्त केला आहे. अनेक वैशिष्टय़ांसहची ही गाडी 2015 मध्ये बाजारात उतरली होती. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 12 हजार 325 गाडय़ा विकल्या आहेत.