अत्याधुनिक सुविधांसह ऑफिस सज्ज – देशात व्यवसाय वाढीचे ध्येय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील दुसरी सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी हय़ुंडाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) यांच्याकडून गुरुग्राममध्ये आपल्या नवीन कॉर्पोरेट मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हय़ुंडाईच्या या कॉर्पोरेट कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कोरियाचे राजदूत चांग जे बुक आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर उपस्थित होते.
‘भारतामध्ये हय़ुंडाईच्या व्यवसायाने 25 वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. ग्राहकांच्या पाठबळावर व विश्वासावर कंपनीने प्रगती साधली असून नवे कॉर्पोरेट कार्यालय सर्व सुविधांसह सज्ज असणार असल्याचे सांगून दरम्यानच्या कालावधीत कंपनीने 1 कोटीहून अधिकच्या मोटारींचे उत्पादन साध्य केले आहे, असे हय़ुंडाईचे एमडी आणि सीईओ एस.एस.किम यांनी म्हटले आहे.