मुंबई :
हय़ुंडाई मोटार इंडियाने गेल्या 22 दिवसात 5 हजार 600 कार्स विकल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात मिळालेला ग्राहकांचा प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीच्या पेटा गाडीला मोठी मागणी असल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिलमध्ये कंपनीने एकही कारची विक्री केली नव्हती. एप्रिल महिन्यात जवळपास अनेक ऑटो कंपन्यांना कोरोनाची चांगलीच झळ बसली होती. सरकारने नियमावलीसह शोरूम्स सुरू करण्याबाबत परवानगी दिल्यानंतर मेमध्ये अनेक कंपन्यांनी मास्क, सामाजिक अंतराची अंमलबजावणी करत शोरुम्स सुरू केली. कंपन्यांनी कार्सची विक्री करण्यासाठी डिजिटल ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर केला. कंपनीने 22 दिवसात 5600 कार्स विक्री केल्या असून नव्या पेटा व वेर्णाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे. कंपनीने आपल्या देशभरातील 806 शोरुम्स नुकत्याच सुरू केल्या आहेत आणि त्यामार्फत ग्राहकांना कार्सची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिली जात आहे. कंपनीच्या शोरुम्समध्ये महिन्यात सुमारे 1 लाखाहून अधिक कारमालकांनी कारची सर्व्हिस करून घेतली आहे.