459 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात, 15 ग्रामपंचायती बिनविरोध
वार्ताहर / मौजेदापोली
दापोली तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकीमधून 158 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता 42 ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या रिंगणात 459 उमेदवार उरले आहेत. तर 15 ग्रामपंचायतीं बिनविरोध निवडून आल्या आहेत.
दापोलीतील 57 ग्रामपंचायतींच्या निवडणूका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर 879 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर 31 डिसेंबर रोजी छाननी करण्यात आली. यात 11 अर्ज अवैद्य ठरविण्यात आले. त्यामुळे 868 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहीले होते. मात्र 4 जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. यात 158 जणांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता 459 उमेदवारांचे भवितव्य आठ दिवसात मशीन बंद होणार आहे.