ओटवणे /प्रतिनिधी-
१९ वर्षाखाली महाराष्ट्र क्रिकेट संघात माजगावचा सुपुत्र तथा प्रसिध्द क्रिकेटपटू अर्जुन उर्फ रोहित राकेश नार्वेकर याची निवड करण्यात आली. पटना येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी ही निवड करण्यात आली आहे. नुकत्याच रत्नागिरी येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट असोशिएशन ऑफ महाराष्ट्र स्पर्धेत रोहित नार्वेकर याने सर्वोत्कृष्ट फलंदाजी केली. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.
एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून रोहितची माजगाव पंचक्रोशीत ओळख आहे. विशेष म्हणजे कोणत्याही ट्रेनिंग शिवाय रोहितने हे यश संपादन केले आहे. या निवडीबद्दल त्याचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.