सोलापूर विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपासून सुरू होणार : कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांची माहिती
तरुण भारत संवाद सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि शासनाच्या आदेशानुसार पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात तसेच संलग्नित महाविद्यालयात ऑफलाइन ऐवजी एक ऑगस्टपासून कॉलेज होणार ऑनलाइन तर 1 सप्टेंबर पासून विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष सुरू होईल अशी माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
सध्या देशात सहा जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वत्र खबरदार यांनी उपाययोजना सुरू आहे. कोरोनाच्या संकटामुळे राज्य शासनाने प्रथम आणि द्वितीय वर्षाचे परीक्षा रद्द केले आणि तृतीय वर्षाच्या परीक्षाबद्दल अद्यापही तोडगा निघालेला नाही. दरम्यान शासनाच्या आदेशानुसार पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना येत्या एक ऑगस्टपासून महाविद्यालय, विद्यापीठात लेक्चर न घेता प्राध्यापक ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. तर तृतीय वर्षाच्या निकालानंतर बी ए, बीएससी, एमएससी, बीकॉम, एम ए प्रथम वर्षाचे शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबर पासून प्रारंभ होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
या प्रकारे होणार ऑनलाइन टिचिंग
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ तसेच महाविद्यालयात प्राध्यापक ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये गुगल मिट, झूम, युट्युब, लाईव्ह यासह विविध पद्धतीने ऑनलाइन टिचिंग देण्यात येणार आहे.
सीईटी ऐवजी मेरीटनुसार प्रवेश ?
दरवर्षी विविध पीजी, व्यवसायिक विभागात प्रथम वर्षांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा देणे बंधनकारक होते. मात्र कोरोनाचे संकट असल्यामुळे यंदाची सीईटी परीक्षा न घेता ऑनलाइन अर्ज, कागदपत्रे विद्यार्थ्यांनी भरावे त्यानंतर मेरीट नुसार प्रवेश दिला जाईल असा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला असल्याचे विशेष सूत्रांकडून सांगण्यात आले.
यंदाही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
कोरोनाचे संकट पाहता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ तसेच महाविद्यालयात यंदाही ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. तृतीय वर्ष आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल. मेरीट नुसार ऑनलाइन प्रक्रिया व प्रवेश दिला जाणार आहे.
एक जुलैपासून प्राथमिक स्वरूपात ऑनलाइन टिचिंग सुरू करणार
कोरोनाच्य पार्श्वभूमीमुळे आमच्या महाविद्यालयात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ची तयारी झालेली आहे. जे विद्यार्थी बारावीला शिकत होते त्यांचे ऑनलाइन फॉर्म भरलेले आहेत. एक जुलैपासून प्राथमिक स्वरुपात झूम, गूगल मीट याचा वापर करून ऑनलाइन टिचिंग सुरू करणार आहोत. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यास टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयात बोलवू. पूर्ण शिक्षण ऑनलाइन पद्धतीने शिकवणे शक्य नाही,विद्यार्थ्यांना काही प्रात्यक्षिके दाखवावे लागतील. परिस्थिती सुधारल्यास महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवू.
प्रा. डॉ. विजयकुमार उबाळे- प्राचार्य, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय