बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर उभारण्यात येणारी नादप्रभू केम्पेगौडाची १०८ फूट उंच कांस्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ८५ कोटी रूपे खर्च केले जात आहेत. ही मूर्ती नोएडा येथे बनविली जात आहे. ती पुढील वर्षी त्या ठिकाणी बसविण्यात येणार आहे, अशी माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथ नारायण यांनी दिली आहे.
प्रसिद्ध शिल्पकार आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त राम वंजी सुतार आपल्या नोएडा स्टुडिओत पुतळ्याची रचना करत आहेत. सुतार यांनी गुजरातमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आणिबेंगळूरमध्ये ‘गांधीजी’चा पुतळा बांधला होता.
कोविड -१९ मुळे हे काम लांबणीवर पडले. पुढच्या वर्षी हा पुतळा तयार होईल. यासाठी ८५ कोटी रुपये खर्च होईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी पुतळ्याच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले.
प्रकल्पाची पायाभरणी मागील वर्षी करण्यात आली होती. बेंगळूरच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभारण्यात येणा २३ एकरांच्या हेरिटेज पार्कमध्ये हा पुतळा बसविला जाईल, असे ते म्हणाले.