ऑनलाईन टीम
२०२२ मध्ये देशातील विविध राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात मुख्यत: उत्तरप्रदेश, गोवा आणि गुजरात विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान, आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीही पक्षीय बांधणीची तयारी सुरु केलीय. यातच कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी पुढील लोकसभा निवडणुका काँग्रेस जिंकेल, असं भाकित वर्तवले आहे. त्यासाठी त्यांनी अजब फॉर्म्युला देखील सांगितला आहे.
पी. चिदम्बरम सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. काँग्रेसकडून त्यांची गोव्यामध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गोव्याच्या सियोलिम भागात पक्ष कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत असताना चिदम्बरम यांनी काँग्रेसची पुढील रणनीती स्पष्ट केली.
चिदम्बरम यांनी गोवा विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकांचा संबंध जोडत काँग्रेसच्या विजयाचं गणित मांडलं. काँग्रेसने २००७ मध्ये गोवा विधानसभा निवडणूक जिंकली आणि त्यानंतर २००९ मध्ये लोकसभा निवडणूक देखील जिंकली. २०१२ मध्ये गोव्यात हरलो आणि २०१४ मध्ये केंद्रातील सत्ता गेली. यावेळी आपण पक्कं केलं आहे की गोवा विधानसभा निवडणुका जिंकायच्याच आणि त्यानंतर लोकसभा निवडणुका देखील आपण जिंकणार”, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
..त्यांना पुन्हा काँग्रेस पक्षात स्थान नाही
२०१७ मध्ये गोव्यात जे काही घडलं, त्यासाठी माफी मागत असल्याचं पक्ष कार्यकर्त्यांसमोर त्यांनी सांगितलं. “ज्यांनी चुका केल्या, त्यांना आपण कदाचित माफ करू. पण आपला झालेला विश्वासघात कधीही विसरणार नाही. त्यांना पुन्हा काँग्रेस पक्षात कधीही स्थान मिळणार नाही. आपल्याला त्या अपमानास्पद घटनेवर पूर्णविराम द्यावा लागेल. असंही ते म्हणाले.
Previous Articleआधीच उपाशी त्यात उपवास अशी ओबीसीची स्थिती – पंकजा मुंडे
Next Article बिडी कॉलनीत पाण्यासाठी धावाधाव
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.