हातकणंगले / प्रतिनिधी
३३ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत आळते (ता. हातकणंगले ) येथील १० हेक्टर डोंगर भागात औषधेरूपी वृक्ष लागवड करून त्यातील ९८ % वृक्ष जीवंत ठेवत हातकणंगले परिसरात वनविभागातील वनक्षेत्रपाल प्रियंका भवार व वनरक्षक अनिल जाधव यांचे कौतुक होत आहे.
हातकणंगले तालुक्यातील आळते येथील १० हेक्टर परिसरात ३३ हजार वृक्ष लागवडी अंतर्गत करण्यात आलेली एकूण २५ हजार औषधरूपी वृक्ष लागवडी मध्ये २४,५०० वृक्ष म्हणजे ९८% वृक्षजीवंत ठेवत आळते डोगराळ परिसरात औषधे वनस्पतीचे लागवड करण्यात आली. यामध्ये करंज -२८००, रेट्री -४८००,गुलमोहर-२९००, मोर आवळा-३८००, लिंब-१९००,वड -१९, पिपंरण -१०००, चिंच -९००, शिलू -२०००, शिवण -३५०, बांबू- ५००, खैर -३०, महारूख-२५०० असे एकूण २४५०० वृक्षाची लागवड जीवंत ठेवली आहेत.
चालू वर्षी म्हणजेच २०२० पावसाच्या हंगामात ही वृक्ष मोठी होऊन या डोंगर परिसरात नैसर्गिक वारसा जपताना दिसून येणार आहे. यामध्ये औषधी वनस्पती लागवड केल्याने या वृक्ष लागवडीस महत्व येणार आहे. निर्जन्य डोंगर परिसरात कोणताही पाण्याचा स्रोत नसताना २४,५०० रोपाना दररोज टॅक्टरच्या टॅंक्टरने पाण्याचा पुरवठा करत तब्बल २४,५०० रोपे जिवंत ठेवत एक नवा आदर्श वनविभागाच्या वनक्षेत्रपाल प्रियंका भवार आणि वनक्षेत्रपाल अनिल जाधव यांनी ठेवत ३३ हजार वृक्ष लागवडी कार्यक्रमा अंतर्गत तब्बल ९८% वृक्ष आळते येथील १० हेक्टर डोंगर भागात केल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्याचे कौतुक ह्या परिसरात होत आहे.( सोबत फोटो – आळते (ता. हातकणंगले ) येथे केलेली डोंगर परिसरात रोप लागवड.