पंतप्रधान ४ फेब्रुवारी रोजी ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभांचे उद्घाटन करणार
दिल्ली/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील चौरी चौरा इथल्या चौरी चौरा शताब्दी समारंभाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत. या दिवशी ‘चौरी चौरा’ घटनेला १०० वर्षे पूर्ण होत असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील ही ऐतिहासिक घटना आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान चौरी चौरा शताब्दीला समर्पित टपाल तिकीटाचे प्रकाशनही करतील. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित रहणार आहेत.
उत्तर प्रदेश सरकारद्वारा आयोजित शताब्दी समारंभ आणि विविध कार्यक्रम राज्यातील सर्व ७५ जिल्ह्यात ४ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू होतील आणि ते ४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत असणार आहेत.