कोरोनाच्या उपाययोजनांबाबत उल्लंघन केल्यास आता दंडात्मक कारवाई
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहर जिल्ह्यातील दुकानात साठ वर्षावरील मालक अथवा नोकर आढळल्यास ते दुकान 7 दिवसाठी सील करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सोमवारी दिला आहे.
सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत चाललेला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे आता साठ वर्षावरील मालक, नोकर दुकानात असल्यास ते दुकान सील करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर चेहऱ्यावर कायम रुमाल, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे, सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखूचे सेवन न करणे यासोबतच वाहतुकीची शिस्त व मास्क वापरा यासंदर्भात त्यांनी नवीन आदेश काढले आहेत. दुचाकीवर फक्त एका व्यक्तीला प्रवास करण्यास परवानगी दिली असून तीन व चारचाकी वाहनात एक चालक व दोन व्यक्तींना प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे.
दुचाकीवर दोघांनी प्रवास केल्यास आता पाचशे रुपये दंड
दुचाकीवर दोघांनी प्रवास केल्यास वाहनचालकास 500 रुपयांचा तर ठिकाणी प्रवास केल्यास साडेसातशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तीन व चारचाकी वाहनात तीन पेक्षा अधिक व्यक्तींना प्रवास केल्यास पाचशे रुपयांचा दंड वाहनचालकास होणार आहे.
नियम न पाळल्यास आता दंडाचा भुर्दंड बसणार
-मास्क न वापरल्यास शंभर रुपये दंड
-जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त दुकाने सुरू राहिल्यास त्यांना एक हजार रुपयांचा दंड
-त्या दुकानात दोन वेळा दंड झाल्यास तिसऱ्या वेळी दुकानाचा परवाना 15 दिवसासाठी निलंबित
-दुकानांमध्ये पाच पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास पाचशे रुपये दंड तर दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार
-सार्वजनिक ठिकाणी थकल्यास दोनशे रुपयांचा दंड सोशल डिस्टंसिंगचे पालन न केल्यास प्रत्येकी शंभर रुपये दंड,
-सार्वजनिक ठिकाणी दारू पान तंबाखू सेवन केल्यास पाचशे रुपयांचा दंड
-दुकानदार व्यवसायिक फिरत्या फळे व भाजी विक्रेत्यांनी मास्क न वापरल्यास शंभर रुपये दंड