बेंगळूर/प्रतिनिधी
मंगळवारी कर्नाटकमध्ये सात ठिकाणी एसीबी अधिकाऱ्यांनी छापा टाकत कारवाई केली. यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मालमत्तेतील मोठ्या गुंतवणूकीसह प्रचंड रोकड व सोने जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसीबी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बेंगळूर, बळ्ळारी, कोलार, धारवाड, दक्षिणा कन्नड, चित्रदुर्ग आणि गुलबर्गा येथे बेकायदेशीर मालमत्तेची प्रकरणे नोंदविण्यात आली आणि त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीखाली शोध घेण्यात आला.
देवराज कल्लेश, पांडुरंग गरग, जयराज के व्ही, डॉ. एन. विजय कुमार, डॉ. श्रीनिवास, चन्नबासप्पा अवत आणि श्रीनिवास हे अधिकारी होते.
एसीबीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्याने गुलबर्गा येथील फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती आणि नुकत्याच खरेदी केलेल्या २३ एकर जागेची मालकी त्यांच्याकडे आहे.