ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या काही दिवसांपासून Better.com कंपनी चर्चेत आहे. कंपनीचे सीईओ विशाल गर्ग यांनी तीन मिनिटांच्या झूम कॉलदरम्यान कंपनीतील ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं होतं. यानंतर विशाल गर्ग यांनी माफी मागितली होती. परंतु माफी मागितल्यानंतरही कंपनीने विशाल गर्ग यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. विशाल गर्ग यांना तात्काळ सुट्टीवर पाठवले जात आहे, अशी माहिती अमेरिकेच्या डिजिटल मॉर्टगेज कंपनीच्या बोर्डाच्या ई-मेलचा हवाला देऊन समोर आली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात वृत्त दिल आहे.
दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला गर्ग यांनी ३ मिनिटांच्या झूम कॉलद्वारे ९०० लोकांना कामावरून काढून टाकले होते. हा आकडा कंपनीमधील एकूण कर्मचारी संख्येच्या नऊ टक्के आहे. विशाल गर्ग यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र विशाल गर्ग यांना टीकेचा सामना करावा लागला होता. यांनतर विशाल गर्ग यांनी या प्रकरणानंतर माफी मागितली होती. पण आता कंपनीने विशाल यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवल्याची माहिती समोर येत आहे.