ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
गूगलला टक्कर देण्यासाठी अमेरिकेची प्रसिद्ध टेक कंपनी ‘ॲपल’ लवकरच स्वतःचे ‘सर्च इंजिन’ लॉन्च करू शकते. टेक वेबसाईट coywolf च्या रिपोर्टमध्ये यासंदर्भात काही मुद्दे आहेत.
coywolf च्या रिपोर्टमध्ये मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या मुद्द्यांचा उल्लेख आहे. त्यानुसार ॲपल नवीन सर्च इंजिन तयार करत असून, त्यासाठी पदभरती करत असल्याचे समजते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गूगल iOS, macOS, आणि ipadOS मध्ये आपले सर्च इंजिन ठेवण्यासाठी ॲपलला कोट्यवधी रुपये देते. या दोघांमधील करार गेल्या काही दिवसांपासून इंग्लंडच्या बाजार नियामकाच्या देखरेखीखाली आला आहे.म्हणूनच ॲपल एक स्वतंत्र सर्च इंजिन तयार करत आहे, जेणेकरून त्याला कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.