ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
ऑनलाईन रिटेल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या ॲमेझॉनचे अमेरिकेतील शेकडो कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपनीकडून कर्मचाऱ्यांची पुरेशी काळजी घेण्यात येत नसल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
अमेरिकेत कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. लॉकडाऊन काळातही ॲमेझॉनने कर्मचारी जीवनावश्यक वस्तूंचा ग्राहकांना पुरवठा करतात. काही कर्मचारी गोडावूनमध्ये काम करतात.असे असताना कंपनीकडून कर्मचाऱ्यांची पुरेशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. आज ॲमेझॉनचे अमेरिकेतील तीनशेहून अधिक कामगार आंदोलन करतील. कामगारांचे हे आजवरचे सर्वांत मोठे सामूहिक आंदोलन असेल, असे कामगार हक्क संघटनेने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.