अनंत-अश्विनी जांगळे यांचे मनोगत
- दोन्हीही मुले आपल्या कुटुंबीयांसमवेत अमेरिकेत आहेत. सध्या कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत असल्याने मुलांसह सुना आणि नातवंडांचीही काळजी लागून राहिली आहे. जरी आपण बेळगावात असलो तरी आमचे मन नेहमीच अमेरिकेत रहात असणाऱया मुलां-बाळांकडे लागून राहिले आहे… हिंदवाडी येथील रहिवासी, जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष अनंत जांगळे आणि माजी नगरसेविका अश्विनी जांगळे सांगत होते. जांगळे यांचा ज्ये÷ सुपुत्र नोकरीनिमित्त आहेत.
- अभिजित पत्नी अमृता आणि आहाना व अर्जुन या मुलांसह 2002 पासून कोलंबस येथे आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ऍट द अर्लिंगटोन येथे एम.एस. करत आहेत. तर सून अमृता कोलंबस येथील बँकेत आहे. लहान मुलगा सुशांत सेंट लुईस येथील नेस्ले कंपनीत इनचार्ज असून 2007 पासून अमेरिकेतच आहे. त्याची पत्नी डॉ. मेघना ही फिजिओथेरपिस्ट असून रिदान व शेषा या आपल्या मुलांसह वास्तव्यास आहेत, अशी माहिती यावेळी जांगळे यांनी दिली.
- अभिजित आणि सुशांतने सेंट पॉल्समध्ये प्राथमिक-माध्यमिक, जीएसएसमधून पुढील शिक्षण आणि जीआयटीमधून इंजिनिअरिंग पूर्ण केले. सुशांतने जूनपासून भारतात परतण्याचे आणि याच ठिकाणी स्थायिक होण्याचे सांगितले. मात्र आताच हा निर्णय घेऊ नको, असा सल्ला आपण दिला आहे. दोन्ही मुले, सुना आणि नातवंडेही आपल्यापासून सातासमुद्रापार असल्याने या सर्वांची आठवण येणे साहजिकच आहे. या आठवणीमुळे बऱयाचदा बेचैन व्हावे लागत आहे. काळजीही वाटत असल्याने वेळ पाहून सर्वांशी फोनद्वारे संवाद साधतो.
- अमेरिकेत असंख्य भारतीय आणि महाराष्ट्रीयन लोक वास्तव्यास आहेत. तर आपल्या मुलांच्या ग्रुपमध्ये 12 जणांचा महाराष्ट्रीयन ग्रुप आहे. दर रविवारी ही मंडळी एकत्रित येत असते. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे होम फ्रॉम वर्क सुरू असल्याने तसेच लॉकडाऊनमुळे केवळ फोनद्वारेच आपल्या ग्रुपशी संपर्क साधता येत आहे, असे मुलांनी कळविल्याचे अनंत आणि अश्विनी जांगळे यांनी सांगितले.
- अमेरिकेत इतक्मया वर्षांपासून आपली मुले रहात असली तरी मातृभाषा, भारतीय संस्कृती आणि संस्कार आजही जपत आहेत. याचा अभिमान वाटतो. नातवंडेही फोन केल्यानंतर ‘नमस्कार आजी-आजोबा’ असे म्हणूनच बोलण्यास सुरुवात करतात. यामुळे मन भरून येते, असे सांगून अश्विनी जांगळेंनी आपले मन हलके केले.
- चौकट करणे
- मुले अमेरिकेत दररोज तरुण भारतचे वाचन करतात!
- अमेरिका येथील सद्यपरिस्थितीबाबतच्या बातम्या पाहून आणि ऐकूण आमच्या मनात चलबिचल सुरू होते. सर्वांनी सांभाळून रहा, असा सल्ला देत असतो. मात्र मुले अमेरिकेत असली तरी दररोज तरुण भारत (ई-पेपर) वाचन करत असतात. आणि बेळगावातील परिस्थितीबाबत माहिती घेऊन आम्हालाच काळजी घेण्याचे सांगतात.