01 February is the anniversary of the re-establishment of Sri Dev Maleshwar Temple
नेमळेचे जागृत देवस्थान अशी ओळख
नेमळे येथील जागृत देवस्थान श्री देव मलेश्वर देवस्थानचा पूनःप्रतिष्ठापनेचा वर्धापनदिन सोहळा बुधवार दि.०१ फेब्रुवारी २०२३ ते शुक्रवार- दि.०३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होत आहे यानिमित्ताने श्री देव मलेश्वर मंदिरामध्ये ‘रुद्र स्वाहाकार सोहळा ‘संपन्न होणार आहे तरी यासोहळ्यास सर्व देणगीदार,भाविक -भक्त ,पाहुणे ,शिमधडे वगैरे मंडळीनी बहुसंख्येने उपस्थित राहून या सोहळ्याच्या कृपाप्रसादाचा ,महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती नेमळे गावातील गांवकर मानकरी तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. यानिमित्त होणारे कार्यक्रम खालील प्रमाणे ——-
बुधवार दि.१ फेब्रुवारी २०२३ सकाळी ७.०० ते ९.०० – शांतीपाठ, देवतांची प्रार्थना , पुण्याहवाहन,संभारदान. सकाळी ९.०० ते दु. १.०० -सिध्दिविनायक महागणपती पूजन प्रकारशुध्दी देवता स्थापना ,रुद्राभिषेक,जयाभिषेक. ,गुरुवार दि.०२ फेब्रुवारी २०२३ सकाळी ७.०० वाजल्यापासून अग्नीस्थापन,होमहवन , सकाळी ११.००वा पूर्णाहूती दुपारी १२.३० वा.महानैवेद्य,आरती ,तिर्थप्रसाद ,महाप्रसाद. शुक्रवार- दि ३ फेब्रुवारी २०२३ सकाळी ११.००वा श्री देवी सातेरी मंदिरामध्ये लघुरुद्र व ब्राह्मण समराधना रात्रौ ठिक १० वा जय हनुमान दशावतारी नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी