Tarun Bharat

1 एप्रिलपासून तब्बल 800 औषधं महागणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अत्यावश्यक असलेल्या तब्बल 800 औषधांच्या किंमतीमध्ये 1 एप्रिलपासून वाढ होणार आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग ऍथॉरिटीने या औषधांच्या दरवाढीला मंजुरी दिली आहे.

पेनकिलर, ऍन्टीबायोटीक्स, ऍन्टीव्हायरल औषधांसह उच्च रक्तदाब, ताप, हृदयरोग, त्वचा रोगाच्या उपचारांमध्ये वापरली जाणारी औषधं महागणार आहेत. मेट्रोनिडाझोलसारखी आवश्यक औषधांच्या किंमतीवरही परिणाम होणार आहे. घाऊक महागाई दरात वाढ झाल्यानं औषधांच्या किमती वाढवाव्या लागत असल्याचे नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग ऑथरिटीनं म्हटलं आहे. औषधांच्या किंमतीत 10.7 टक्क्मयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

कोरोनाची मध्यम ते गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचे दरही वाढणार आहेत. जीवनावश्यक वस्तू आणि इंधन दरवाढीसोबत सर्वसामान्य जनतेला आता औषध दरवाढीचाही फटका बसणार आहे.

Related Stories

शहरांमुळेच विकासाला मिळणार वेग

Patil_p

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

Archana Banage

योगी आदित्यनाथांचा 25 रोजी शपथविधी

Amit Kulkarni

१०० सेकंद कृतज्ञतेचे..ओडिशा येथून शाहू महाराजांना अभिवादन

Abhijeet Khandekar

देशात पहिल्यांदाच धावली ग्रीन हायड्रोजन कार, गडकरींचा संसदेपर्यंत प्रवास

datta jadhav

सीबीएसई सत्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीने

Amit Kulkarni