Tarun Bharat

1 नोव्हेंबर खटल्याची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

Advertisements

3 एप्रिल रोजी होणार पुढील सुनावणी

प्रतिनिधी / बेळगाव

1 नोव्हेंबर काळय़ा दिनी म. ए. समितीतर्फे मूक सायकलफेरी काढण्यात येते. 2016 सालीही मूक सायकलफेरी काढण्यात येत होती. यावेळी पोलिसांनी अचानक कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. त्या ठिकाणी दगडफेक घडली. त्यानंतर शहापूर पोलिसांनी म. ए. समितीच्या 43 जणांवर गुन्हा नोंदविला. या खटल्याची सुनावणी सोमवारी होती. मात्र, ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली असून 3 एप्रिल रोजी ही सुनावणी होणार आहे. सोमवारी जेएमएफसी तृतीय न्यायालयामध्ये 27 जण हजर होते. 43 जणांमधील म. ए. समितीचे कार्यकर्ते नारायण पाटील (कडोली) यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, इतर 14 जण गैरहजर होते. त्या सर्वांना न्यायालयाने वॉरंट बजावले आहे. या खटल्यामध्ये कार्यकर्त्यांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे काम पाहत आहेत.

Related Stories

मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज बंद

Patil_p

शहर परिसरात भाऊबीज साजरी

Patil_p

भीषण अपघातात युवक गंभीर; दोन्ही पाय निकामी

Rohan_P

संगोळ्ळी रायण्णा रोडवर डेकोरेटिव्ह पथदीप

Amit Kulkarni

शहर परिसरात रंगपंचमी साधेपणाने

Amit Kulkarni

कर्नाटक: वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी पंतप्रधानांना कोरोना परिस्थितीबद्दल दिली माहिती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!