Tarun Bharat

1 नोव्हेंबर रोजी तालुक्मयात कडकडीत हरताळ

Advertisements

घरांवर काळे ध्वज-दंडाला काळय़ा फिती बांधण्याचे आवाहन

प्रतिनिधी/ बेळगाव

मराठीबहुल असलेला सीमाभाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. 1 नोव्हेंबर 1956 ला हा भाग कर्नाटकात घातल्यानंतर येथील मराठी भाषिकांनी कर्नाटक सरकारविरोधात आजपर्यंत लढा दिला आहे. 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून गांभीर्याने पाळण्यात येतो. यावर्षीही तालुक्मयामध्ये कडकडीत हरताळ पाळून 1 नोव्हेंबर रोजी घरांवर काळे ध्वज आणि दंडाला काळय़ा फिती बांधून कर्नाटक सरकारचा निषेध नेंदविणार असल्याचा ठराव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश डुकरे होते.

तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे म्हणाले, अन्यायाने आम्हाला या ठिकाणी डांबण्यात आले आहे. शक्मयतो एकभाषिक लोकांचे राज्य व्हावे, त्या राज्यामध्ये भिन्नभाषिक लोक कमीत कमी असावेत हा भाषावार प्रांतरचनेचा मूळ मुद्दा होता. मात्र, महाराष्ट्राच्या निर्मितीच्या बाबतीत हा मुद्दा बाजूला ठेवून आम्हाला कर्नाटकात डांबण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत आम्ही एकजुटीने हा लढा दिला आहे. यापुढेही लढा सुरूच ठेवणार असून यासाठी संघटना मजबूत बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्मयातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना संघटित करून लवकरच व्यापक बैठक बोलाविण्यात येणार आहे. 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळल्यानंतर लवकरच बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले. हुतात्म्यांनी दिलेले योगदान प्रत्येकाने जाणले पाहिजे. त्यांचा त्याग आठवला पाहिजे. त्यांची प्रेरणा प्रत्येकाने घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

अशोक पाटील म्हणाले, एकजुटीने राहून प्रत्येकाने हा लढा लढणे काळाची गरज आहे. कोणीही एकाधिकारशाही गाजवणे हे संघटनेच्यादृष्टीने धोक्मयाचे आहे. तेव्हा संघटित राहून हा लढा लढणे महत्त्वाचे आहे. अनेकांनी आपल्या घरांची राखरांगोळी करून या लढय़ात योगदान दिले आहे. त्यांची प्रेरणा प्रत्येकाने घेतली पाहिजे. यासाठीच भगव्या झेंडय़ाखाली प्रत्येकाने आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

तालुका पंचायत माजी उपाध्यक्ष यल्लाप्पा बेळगावकर यांनी, गेली 65 वर्षे आम्ही हा लढा लढत आहे. दिवंगत माजी आमदार बी. आय. पाटील यांनी सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये धडक मारली होती. महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची नेहमी भेट घेऊन पाठपुरावा केला होता. अशा प्रकारेच यापुढेही महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्ष सुरेश डुकरे यांनीही सीमाभागातील मराठी जनतेने एकत्र येऊन हा लढा लढावा, असे आवाहन केले. 1 नोव्हेंबर रोजी काळे ध्वज प्रत्येकाने आपल्या घरांवर लावावेत. याचबरोबर दंडाला काळय़ा फिती बांधाव्यात आणि कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीला पुंडलिक मोरे, संजीव भोसले, कृष्णा पाटील, बाळू इंगळे, यल्लाप्पा जायण्णाचे, शट्टूप्पा चव्हाण, परशराम पाटील, नामदेव सांबरेकर, यशवंत गुरव, राजेंद्र पाटील, पांडुरंग गावडा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Related Stories

आसनाअभावी प्रवाशांची गैरसोय

Omkar B

येळ्ळूर येथे व्यायामशाळेचे थाटात उद्घाटन

Amit Kulkarni

क्लब रोडवरील पथदीप दिवसा सुरू अन् रात्री बंद..

Amit Kulkarni

फिजिओथेरपी महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद

Patil_p

आरपीडी कॉलेजतर्फे आकाशकंदील बनविण्याची स्पर्धा

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक येथे गोठय़ाला आग

Amit Kulkarni
error: Content is protected !!