Tarun Bharat

1 मेपासून बेळगावात आयुर्वेद केंद्र

देशातील 37 ठिकाणांची निवड : कॅन्टोन्मेंट किंवा सैन्य रुग्णालयात होणार स्थापना

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

आयुर्वेदिक पद्धतीद्वारे उपचार करवून घेण्याप्रकरणी केवळ भारतच नव्हे तर विदेशातही लोकांमधील स्वारस्य आणि आयुर्वेदसंबंधी विश्वासार्हता वाढली आहे. कोरोना संकटानंतर आयुर्वेदाबद्दल लोकांचा भरवसा वाढला आहे. आजारापासून बचावासाठी आयुर्वेदाला सर्वोत्तम उपचारपद्धती मानण्यात आले आहे. भारत सरकारचे आयुष मंत्रालय देशातील 37 शहरांमध्ये आयुर्वेदिक केंद्र सुरू करणार असून या शहरांमध्ये पूर्वीपासून असलेल्या सैन्य किंवा छावणी रुग्णालयांमध्ये याची निर्मिती होणार आहे. या 37 शहरांमध्ये बेळगाव शहराचाही समावेश आहे. आयुर्वेदिक केंद्रांचे कामकाज 1 मेपासून सुरू होणार आहे.

आयुर्वेदला आरोग्य संस्थांशी जोडण्यासाठी आयुष मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने अलीकडेच मिळून निर्णय घेतला आहे. 1 मेपासून देशभरातील 37 छावणी किंवा सैन्य रुग्णालयांमध्ये आयुर्वेद केंद्राचे संचालन केले जाणार आहे. यासंबंधी आयुष मंत्रालय या 37 छावणी किंवा सैन्य रुग्णालयांमध्ये कुशल आयुष डॉक्टर आणि फार्मसिस्ट उपलब्ध करविणार आहे. संरक्षण मंत्रालय 10 प्रमुख सैन्य रुग्णालयांना आयुष डॉक्टर आणि फार्मसिस्ट प्रदान करेल, यात 166 एमएच, सीएच (डब्ल्यूसी), चंडीमंदिर, एमएच जयपूर, सीएच (सीसी) लखनौ, एमएच देहरादून, एमएच जबलपूर, सीएच (एससी) पुणे, एमएच सिकंदराबाद, सीएच (ईसी), कोलकाता आणि 151 बीएच रुग्णालय सामील आहे.

या संस्थांमधील कर्मचाऱयांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आयुष मंत्रालय कुशल आणि तज्ञ आयुर्वेद डॉक्टर तसेच फार्मसिस्टला पॅनेलमध्ये सामील करणार आहे. यामुळे कॅन्टोन्मेंटचे रहिवासी ज्यात सशस्त्र दलांचे कर्मचारी, त्यांची कुटुंबं आणि सर्वसामान्य नागरिकांना या रुग्णालयांकडून आयुर्वेद आरोग्य सेवांचा लाभ घेता येणार आहे. संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राकेश कोटेचा यांच्यात अलिकडेच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत झालेल्या या कराराच्या माध्यमातून आयुष मंत्रालय आणि महासंचालनालय, डीजीएएफएमएसने एएफएमएस रुग्णालयांच्या अंतर्गत आयुर्वेदम केंद्रांना संचालित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयुर्वेद केंद्रांसाठी निवडलेली शहरे

आगरा, अलाहाबाद, बरेली, देहरादून, महू, पंचमढी, शाहजहांपूर, जबलपूर, बदामी बाग, बैरकपूर, अहमदाबाद, देहुरोड, खडकी, सिकंदराबाद, डगशाई, फिरोजपूर, जालंधर, जम्मू, जुतोघ, कसौली, खासयोल, सुबाथू, झाशी, बबीना, रुडकी, दानापूर, कॅम्पटी, रानीखेत, लैंसडाउन, रामगढ, मथुरा, बेळगाव, मोरार, वेलिंग्टन, अमृतसर, बकलोह, डलहौजी

Related Stories

इमामी रियॅल्टी विक्री वाढविण्याच्या प्रयत्नात

Patil_p

गिरिराज सिंग यांचे वादग्रस्त विधान

Patil_p

कर्नाटक: “काँग्रेसला थेट लस खरेदीसाठी परवानगी द्या”

Archana Banage

मणिपूरमध्ये उग्रवाद्यांच्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू

Patil_p

…मग शिवसेना माझी आहे असं म्हणू का?, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Archana Banage

तुफान दगडफेकीनंतर कोलकात्यात तणाव

Patil_p