बेळगाव तालुका म. ए. समितीचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
भाषावार प्रांतरचना करताना केंद्र सरकारने मराठी बहुल असलेला सीमाभाग तत्कालीन म्हैसूर राज्यात डांबला. याचा निषेध म्हणून गेली 65 वर्षे सीमाभागावर 1 नोव्हेंबर रोजी कडकडीत हरताळ पाळून भव्य मुकसायकलफेरी मिरवणूक काढण्यात येते. मात्र यावषी कर्नाटक सरकारने कोरोना महामारीचे कारण पुढे करून सायकल फेरी व जाहीर सभेला निर्बंध घातले आहेत. एक प्रकारे सीमावासियांच्या व्यथा मांडण्याची गळचेपी सुरू आहे. मात्र मराठी भाषिकांनी कायद्याच्या चौकटीत राहून कोरोनाचे नियम पाळत लोकशाही मार्गाने 1 नोव्हेंबर रोजी गांभीर्याने काळा दिन पाळून निषेध नोंदवावा, असे आवाहन बेळगाव तालुका म. ए. समितीतर्फे करण्यात आले.
कोरोनाच्या महामारीत देखील आम्हाला निषेध नोंदवायचा आहे. मनात मोठी इच्छा आहे. प्रत्येक कार्यकर्ता त्यासाठी धडपडत आहे. पण या कोरोनाचे कारण पुढे करून दडपशाही सुरू आहे. तरी देखील आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून निषेध नोंदवायचा आहे. मराठी भाषिकांनी कडकडीत हरताळ पाळत काळे मास्क परिधान करून, सोशल डिस्टन्स ठेऊन, प्रत्येक भागामध्ये आणि गावामध्ये निषेध व्यक्त करायचा आहे. मात्र कोणीही कायदा मोडू नका, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
दंडाला काळय़ाफिती व काळे ध्वज घेऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदवा. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोजक्मया कार्यकर्त्यांसह रेल्वे ओव्हरब्रिजजवळील मराठा मंदिरच्या खुल्या जागेमध्ये धरणे धरून समस्त सीमावासियांच्या भावना व्यक्त करेल. याप्रमाणे कार्यक्रम ठरला असून बेळगाव तालुक्मयातील मराठी जनतेने आपल्या गावी निषेध व्यक्त करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अध्यक्ष निंगोजी हुद्दार, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस एल. आय. पाटील, उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील, खजिनदार एस. एल. चौगुले, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, ता. पं. सदस्य व एपीएमसी सदस्य यांनी हे आवाहन केले आहे.