नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 15 नोव्हेंबरच्या काळात 1.02 कोटीहून अधिक करदात्यांना 1.19 लाख कोटी रुपयांचा प्राप्तीकर परतावा सुपूर्द करण्यात आला आहे. प्राप्तीकर विभागाने सदरील माहिती दिली आहे. 1 कोटी 42 हजार 619 प्रकरणात 38,034 कोटी रुपये प्राप्तीकर विभागाने परताव्यारूपी दिले आहेत तर 81,059 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कररूपी परतावा देण्यात आला आहे.