चीनमध्ये जर तुम्ही एखाद्या रस्त्यावर कुणाला रोखून त्याचे आडनाव विचारल्यास तो वांग, ली, झांग, लिउ किंवा चेन यापैकी एक सांगेल. गणितात ज्याला ‘प्रोबॅबिलिटी थेअरी’ म्हटले जाते, त्यानुसार हा दावा योग्यही वाटतो. कारण ही पाच आडनावे चीनच्या 30 टक्के लोकसंख्येची म्हणजेच 43.3 कोटी लोकांची आहेत. चीनमध्ये आडनावांचा तुटवडा आहे.
एका अनुमानानुसार सुमारे 140 कोटीच्या आकडय़ापर्यंत चीनची लोकसंख्या पोहोचणार आहे. या आकडय़ाच्या हिशेबाने तेथील आडनावे खूपच कमी आहेत. सुमारे 6000 आडनावे वापरात असली तरीही 86 टक्के लोकसंख्येदरम्यान केवळ 100 आडनावेच लोकप्रिय असल्याची माहिती चीनच्या जनसुरक्षा मंत्रालयाच्या दस्तऐवजांद्वारे समोर आली आहे.
चीनचा इतिहास स्थलांतर, राजकीय संघर्ष आणि युद्धांनी भरलेला असल्याने याचा थेट प्रभाव लोकांच्या नावावरही पडत राहिला. नवे वंश आणि शासकांच्या काळात जुन्या गोष्टी सोडून देण्यात आल्या आणि यात आडनावेही सामील होती. अनेकदा भाषेच्या दृष्टीकोनातून नावे बदलण्यात आली, तर काहीवेळा अंधश्रद्धेमुळे आडनावांचा त्याग झाला.