Tarun Bharat

शिरोडय़ात 1.30 लाखांचा गांजा जप्त; संशयिताला अटक

प्रतिनिधी /फोंडा

अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी एका युवकाला फोंडा पोलिसांनी शिरोडा येथून अटक केली. जॉय जॉस आंताव (वय 26, तळपणे शिरोडा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 1  किलो 300 ग्रा. वजनाचा सुमारे रू. 1 लाख 30 हजार किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. मंगळवारी उशिरा रात्री शिरोडा बसस्थानकाजवळ ही कारवाई करण्यात आली.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक युवक शिरोडा बसस्थानकाजवळ अमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार फोंडा पोलिसांनी सापळा रचून ही धडक कारवाई केली. संशयित ज्युपिटर दुचाकी जीए 05 एम 5377 वर गांजासदृष्य पदार्थाची बॅग ठेवून आला होता. साधारण 1 किलो 300 ग्राम वजनाच्या गांजासह त्याला ताब्यात घेण्यात आले. उपअधिक्षक चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नारायण पिल्ले, साजिथ पिल्लई, हवालदार केदारनाथ जल्मी, पोलिस शिपाई अमेय गोसावी, धावेश खरात, ओमकार सावंत, मयुर जांबोटकर, आदित्य नाईक यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी संशयिताविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली असून उपनिरीक्षक साजिथ पिल्लई अधिक तपास करीत आहे.

Related Stories

‘सनबर्न’ आयोजकांवर खटला दाखल करणार

Amit Kulkarni

कोरोना काळात बागायतदार आशिष गोब्रोची घरोघरी सेवा

Amit Kulkarni

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या चौथऱयाला वाहनाची धडक

Patil_p

कीर्तनातून समाजातील ज्वलंत प्रश्न मांडावेत

Amit Kulkarni

म्हादई अभयारण्य जमीन संघर्ष पेटला

Amit Kulkarni

खोतीगाव सरकारी शाळा इमारतीचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करावे

Omkar B