Tarun Bharat

नोव्हेंबरमध्ये जीएसटी 1.46 लाख कोटी

मागील वर्षीच्या तुलनेत 11 टक्के अधिक संकलन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये 1.46 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत हे संकलन 11 टक्क्यांनी अधिक आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये 1.32 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. तसेच मागील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये 1.52 लाख कोटी इतका जीएसटी जमा झाला होता.

नोव्हेंबर 2022 च्या संकलनात 25,681 कोटी रुपये सीजीएसटी, 32,651 कोटी रुपये एसजीएसटी, 77,103 कोटी रुपये आयजीएसटी (आयातीतून कमावलेले रु. 38,635 कोटी) आणि उपकरातून रु. 10,433 कोटी (आयातीतून गोळा केलेले रु. 817 कोटी) सरकारी तिजोरीत जमा झाले.

महाराष्ट्र, कर्नाटकची आघाडी कायम

नोव्हेंबर 2022 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप-5 राज्यांमध्ये अव्वल आहे. गेल्या वषीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन 16 टक्क्यांनी वाढून 21,611 कोटी रुपये झाले आहे. या यादीत 10,238 कोटींच्या कलेक्शनसह कर्नाटक दुसऱया तर गुजरात 9,333 कोटींच्या कलेक्शनसह तिसऱया क्रमांकावर आहे.

एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाचा विक्रम

एप्रिल महिन्यात आतापर्यंतचे सर्वात मोठे जीएसटी संकलन झाले आहे. एप्रिल 2022 मध्ये पहिल्यांदाच जीएसटी संकलन 1.5 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. एप्रिलमध्ये एकूण जीएसटी महसूल 1,67,540 कोटी रुपये नोंदवला गेला.   त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातही 1 लाख 51 हजार 718 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आले.

चालू आर्थिक वर्षातील संकलन

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात एप्रिलमध्ये एकूण 1,67,540 कोटी जीएसटी संकलन झाले, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. त्यानंतर हा आकडा मे महिन्यात 1,40,885 कोटी, जूनमध्ये 1,44,616 कोटी, जुलैमध्ये 1,48,995 कोटी इतका होता. ऑगस्ट महिन्यात 1,43,612 कोटी, सप्टेंबर महिन्यात 1,47,686 कोटी आणि ऑक्टोबरमध्ये 1,51,718 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आले.

Related Stories

युगांडात नग्न होऊन पळाले 200 कैदी

Patil_p

टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन

Abhijeet Khandekar

दहशतवाद पोसणाऱया देशांना धडा शिकवा

Patil_p

मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार 7 जुलैला शक्य

datta jadhav

हिंदूंप्रमाणेच मुस्लिमांचीही घेऊ पूर्ण काळजी

Patil_p

राज्यात ऑनलाईन जुगार बंदी

Patil_p