2021 च्या तुलनेत हा आकडा 24 टक्क्यांनी अधिक असल्याची नोंद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निधी संघटना (इपीएफओ) याच्यासोबत एप्रिल 2022 मध्ये 17.08 लाखजण जोडले आहेत. जे एप्रिल 2021 च्या तुलनेत 34 टक्के जादा राहिले आहेत. या आकडेवारीवरुन आता देशामध्ये पुन्हा रोजगारात वाढ होत असल्याचे संकेत निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत आहे. या अगोदर एप्रिल 2021 मध्ये 12.76 लाख सदस्य जोडले होते. मात्र हा आकडा मार्च 2022 मध्ये 15.32 लाख सबस्क्राईबर इपीएफओशी जोडले होते.
इपीएफओकडून नुकत्याच सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये जे 17.08 लाख सबस्क्राइबर जोडले असल्याची माहिती पुढे आली आहे. यामधील 9.23 लाख पहिल्यांदा इपीएफओत समाविष्ट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर 7.85 लाख सबस्क्राइबर इपीएफच्या बाहेर गेले होते. परंतु दुसरी नोकरी मिळाल्यामुळे किंवा नोकरी बदलल्यामुळे इपीएफओचे सदस्य बनले आहेत.
महिलांची हिस्सेदारी 21.38 टक्क्यांवर
एकूण सबस्क्राइबर्समध्ये महिलांनी आपली संख्या वाढवली आहे. महिलांची संख्या 3.65 लाख आहे. म्हणजे मार्च 2022 च्या तुलनेत 17,187 संख्या अधिक आहे. एकूण पगारातील महिलांमध्ये सबस्क्राइबर्सची हिस्सेदारी ही 21.38 टक्के आहे.
2021-22 मधील जोडलेले सदस्य
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये इपीएफओसोबत 1.22 कोटी सदस्य जोडले आहेत. ही संख्या 2020-21 मध्ये 77.08 लाख, 2019-20 मध्ये 78.58 लाख आणि 2018-19 मध्ये 16.12 लाख इतकी राहिली होती.
घसरणीतील राज्य
सीएमआयइ यांच्या आकडेवारीनुसार मे 2022मध्ये देशातील बेरोजगारीचा दर हा 7.1 टक्के राहिला. या अगोदर एप्रिलमध्ये हा दर 7.83 टक्के होता. देशात सर्वात कमी बेरोजगारीचा दर हा 0.7 टक्के छत्तीसगढमध्ये राहिला होता. या पाठोपाठ 1.6 टक्क्यांसोबत मध्यप्रदेश राहिला आहे. ज्यानंतर कमी बेरोजगारीच्या राज्यांमध्ये गुजरातमध्ये 2.1, ओडिसा 2.6, उत्तराखंड 2.9, तामिळनाडूत 3.1, उत्तर प्रदेशात 3.1, महाराष्ट्रात 4.1, मेघालय 4.1, कर्नाटकात 4.3, आंध्रप्रदेशात 4.4, पुडुचेरीमध्ये 5.6 आणि केरळमध्ये हा दर 5.8 टक्के इतका राहिला असल्याची माहिती आहे.
सर्वाधिक बेरोजगारातील राज्य
देशात सर्वाधिक बेरोजगाराचा दर हा हरियाणात असून तो 24.6 टक्के राहिला आहे. यासोबत राजस्थानात 22.2, जम्मू आणि काश्मीर 18.3, त्रिपुरात 17.4, दिल्लीत 13.6, गोवा 13.4, बिहार 13.3, झारखंड 13.1, हिमाचल प्रदेश 9.6, तेलंगना 9.4, पंजाब 9.2, आसाममध्ये 8.2 ओण सिक्किमचा बेरोजगारीचा दर हा 7.5 टक्के राहिला असल्याची माहिती आहे.