वृत्तसंस्था/ कानपूर
भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचे कानपूरचे जुने पारंपरिक घर विकले आहे. त्या घराला 1 कोटी 80 लाखाची किंमत मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. पाटण्यातील एका डॉक्टर कुटुंबाने ते विकत घेतले आहे. रामनाथ कोविंद यांनी आपल्या घराची पॉवर ऑफ ऍटॉर्नी आनंदकुमार यांना दिली होती.
आनंदकुमार यांनीच या घराची विक्री करून दिली. तसेच विक्रीची नोंदही केली. भारताच्या माजी राष्ट्रपतींच्या घरात राहण्याचा योग आल्याने या डॉक्टर कुटुंबाने परमेश्वराचे आभार मानले आहे. रामनाथ कोविंद याचवर्षी राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले असून नियमानुसार त्यांना दिल्लीमध्ये बंगला देण्यात आला आहे. आता हा बंगला त्यांच्याच मालकीचाच झाला असल्याने त्यांनी आपले जुने घर विकल्याची माहिती देण्यात आली. कोविंद यांनी स्वतः हे घर बांधले होते.