वाहतूक पोलीस विभागागाची कारवाई : सहा महिन्यांत नियम उल्लंघनाच्या सुमारे 19316 तक्रारी नोंद : सर्वाधिक दंड ‘नो पार्पिंग’उल्लंघनात
फोंडा : फोंडा वाहतूक विभागाने मागील सहा महिन्यांत नियम उल्लंघनाच्या सुमारे 19316 तक्रारी नोंद केलेल्या आहेत. यातून दंडाच्या स्वरूपात रू. 1 कोटी 11 लाख 75 हजार रुपयांची रक्कम सरकारी तिजोरीत जमा केलेली आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे सुमारे 3120 जणांचे वाहतूक परवाने रद्द करण्यात आल्याची कारवाई करण्यात आलेली आहे. फोंडा वाहतूक पोलीस विभागाने मागील सहा महिन्यांत नियम उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.
फोंडा वाहतूक पोलीस विभागातर्फे वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी विद्यालये, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी, औद्योगिक वसाहत परिसरात जागृती कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा सानारी यांनी दिली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे वाहतूक परवाना (लायसन्स) रद्द झाल्यानंतर परवान्याच्या नूतनीकरणासाठी वाहतूक पोलीसांनी वाहतूक विभागाकडे (आरटीओ)कडे एक दिवशीय प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे. आरटीओकडून प्रशस्तीपत्र प्राप्त केल्यानंतर वाहन परवान्याचे नूतनीकरण करण्यात येते. वाहन चालविताना कायद्याचे पालन करा, आपला जीव सांभाळा व इतरांनाही त्रासात घालू नका, हेल्मेट, सिटबेल्ट परिधान करा. वाहतूक नियमांचे पालन करा असे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी केले आहे.
जाने. 2024 ते 15 जून 2024 पर्यंत कारवाई करण्यात आालेला तक्ता
- अतिवेगाने वाहन चालवण 1610
- मद्यसेवन करून वाहन चालवणे 140
- विनाहेल्मेट 883
- धोकादायक पार्किंग 1721
- मोठ्या लाईट वापरणे 351
- वाहन चालवतान मोबाईलवर बोलणे 35
- रस्त्यावरील लेन कटिंग 2426
- काळ्या काचा लावणे 2068
- नो एन्ट्री 2673