Tarun Bharat

ईडीच्या छापासत्रात 1 कोटींची रोकड जप्त

दिल्लीतील मद्य धोरण घोटाळय़ाशी संबंधित कारवाई ः डिजिटल उपकरणे, कागदपत्रेही जप्त

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग आणि दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात छापे टाकल्यानंतर सुमारे 1 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ईडीच्या अधिकाऱयांनी शुक्रवारी दिल्ली-एनसीआर, पंजाब आणि तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये सुमारे 35 ठिकाणी छापे टाकले होते. दुसऱयांदा झालेल्या या धडक कारवाईमध्ये दारू व्यापारी, वितरण कंपन्या आणि संबंधित संस्थांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये एका ठिकाणाहून सुमारे एक कोटींची रोकड जप्त करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी शनिवारी सांगितले. तथापि, जप्तीची ठिकाणे त्यांनी उघड केली नाहीत. काही डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

केंद्रीय एजन्सीने दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणी आतापर्यंत 103 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. गेल्या महिन्यात मद्यविक्रेतेआणि मद्यनिर्माता कंपनी इंडोस्पिरिटचे व्यवस्थापकीय संचालक समीर महेंद्रू यांना अटक केली आहे. तसेच ईडीच्या अधिकाऱयांनी दिल्लीस्थित टीव्ही वृत्तसंस्थेच्या संचालकाला अटक केली आहे. सदर संशयित तेलगू दैनिकाच्या संचालक मंडळावरही कार्यरत आहे.  

दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्ही. के. सक्सेना यांनी दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरण 2021-22 च्या . अंमलबजावणीतील कथित अनियमिततेची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केल्यानंतर मद्य धोरण चौकशीच्या फेऱयात अडकले आहे. याप्रकरणी त्यांनी उत्पादन शुल्कच्या 11 अधिकाऱयांना निलंबितही केले होते. या प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहे.

Related Stories

चिंताजनक : देशात २४ तासांत ६९ हजार कोरोनाबाधित

Archana Banage

देशात 48,268 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

दहावी, बारावी परीक्षांसाठी नियम शिथिल

Patil_p

इलेक्ट्रॉनिक चिपची टंचाई लवकरच होणार दूर

Patil_p

सैन्यभरतीच्या तयारीसाठी दिल्लीत शाळा

Patil_p

प्रलंबित खटले हे मोठे आव्हान

Patil_p