केदारनाथ / वृत्तसंस्था
केदारनाथजवळ सोमवारी भूस्खलनाची दुर्घटना घडली. डोंगरावरून घसरलेले खडक तंबूवर कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. ही घटना जंगलचट्टी परिसरात सोमवारी पहाटे घडल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. घटनेच्या वेळी दोन जण मंडपात झोपले होते. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा थोडक्मयात बचावला. उत्तराखंडच्या टेकडय़ांवर गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे भूस्खलनाचा धोका वाढला आहे, असे अधिकाऱयाने सांगितले. पावसाचा जोर वाढल्यामुळे लोकांना अधिक सतर्क करण्यात आले आहे. विशेषतः पर्वतमय आणि डोंगराळ भागात सावधानता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.