जत, प्रतिनिधी
जत शहरातील शेगाव रोडवरील माने वस्तीवरील गणपती यशवंत माने (वय 52) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी 79 हजारांचे सोन्याचे, चांदीचे दागिने व रोख 60 हजार, असा एक लाख 39 हजारांचा मुद्देमाल पळवला आहे. सोमवारी दि. 27 मार्च रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत जत पोलिस ठाण्यात माने यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी की, यशवंत माने यांचे दोन्ही मुले मुंबई व पुणे येथे कामास आहेत. घरी पती पत्नी दोघेच राहण्यास आहेत. नेहमी प्रमाणे दोघेही घराला कुलूप लावून शेजारीच असलेल्या गोठ्यात झोपी गेले. सकाळी 6 वाजता उठल्यावर घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातील साहित्य चोरट्यानी चोरून नेला होता.
यानंतर माने यांनी पुण्यावरून मुलाला बोलावून सोन्याचे दागिने व पत्नीच्या उपचारासाठी ठेवलेले रोख रक्कम गेल्याची खात्री पटवून. आज जत पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली असून याबाबत जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.