वनखात्यातर्फे सवलतीच्या दरात विविध प्रकारची रोपे उपलब्ध : मागणीत वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
वनखात्यातर्फे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी दरवषी लाखो रोपांची लागवड केली जाते. त्याबरोबर शेतकऱयांना सवलतीच्या दरात रोपांचे वितरण केले जाते. यामध्ये काजू, बांबू, सागवान, बाभूळ, गुलमोहोर, फणस, शिसम, जांभूळ आदी प्रकारच्या रोपांचा समावेश आहे. तर अनुसूचित जाती-जमातील शेतकऱयांना मोफत वितरण केले जाणार आहे. संबंधित शेतकऱयांनी वनखात्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
शिवारात विविध जातीची झाडे निर्माण व्हावीत, याकरिता शेतकऱयांना यंदा 1 लाख 27 हजार रोपांचे वितरण केले जाणार आहे. शेतकऱयांना दरवषी सवलतीच्या दरात रोपांचे वितरण केले जाते. वनखात्यातर्फे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी दरवषी लाखो रोपांची लागवड केली जाते. मान्सूनपूर्व पावसाने चांगली साथ दिल्याने जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरच रोप लागवडीचे आणि रोप वितरणाचे काम हाती घेतले जाणार आहे.
बेळगाव विभागात मच्छे, हलभावी, होसकोटी, शिरूर, खानापूर तालुक्मयातील ओतोळी, सावरगाळी, कणकुंबी, लोंढा, नागरगाळी, गोल्याळी आदी ठिकाणी असलेल्या नर्सरींमध्ये रोपे उपलब्ध आहेत.
वनखात्याच्यावतीने बेळगाव विभागातील खानापूर, बैलहोंगल, हुक्केरी, गोकाक आदी ठिकाणी रोपे वितरित केली जात आहेत.
विविध वनक्षेत्रात होणार लागवड
मागील दोन वर्षांत कोरोनामुळे रोप वितरण विस्कळीत झाले होते. मात्र यंदा शेतकऱयांना सवलतीच्या दरात रोप वितरण केले जाणार आहे. विविध वनक्षेत्रात ही लागवड केली जाणार आहे. शेतकऱयांसाठी विविध जातींची रोप उपलब्ध आहेत.
– जी. पी. हर्षाबानू (उपवनसंरक्षणाधिकारी, बेळगाव)