Tarun Bharat

अंबाबाई दर्शनासाठी दररोज १ हजार ‘पेड पास’

जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची माहिती : ऑनलाईन ऐवजी मॅन्यूअल पास : दर्शन रांग मंदिरातूनच : छत्रपती शिवाजी चौकातून मंदिरापर्यंत मॅटींग

प्रतिनिधी/कोल्हापूर

नवरात्रोत्सव काळात अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज एक हजार पेड पास दिले जाणार आहेत. ऑनलाइन ऐवजी अंबाबाई मंदिरातील कार्यालयातूनच मॅन्युअल स्वरूपात हे पास दिले जाणार आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सव काळात केवळ 1 हजार पासधारकांनाच दर्शन मिळणार असून त्यांची रांग स्वतंत्र असेल. शासन आणि न्यायालयाच्या आदेशाच्या आधारेच पास व्यवस्थेचे नियोजन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पत्रकार बैठकीत दिली.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, कोरोना महामारीपूर्वी ज्या पद्धतीने दर्शन व्यव्यस्था होती, त्याच पद्धतीने यावेळीही दर्शन रांगेचे नियोजन केले जाईल. दर्शन रांग मंदिरातून सुरु होणार असून भाविकांना मंदिराकडे चालत जाताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी चौकातून मंदिरापर्यंत मॅटींग केले जाणार आहे. कोल्हापूरात येणाऱया भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. महाद्वार रोडवरील चारचाकी वाहनांना बंदी घालण्यासाठी व्यापारी अथव लोकप्रतिनिधींचा कोणताही विरोध नाही. त्यांच्याशी चर्चा करूनच प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

तातडीने मूर्तीसंवर्धन
अंबाबाईच्या मुर्तीची झीज झाल्यामुळे 2015 मध्ये केमिकल कॉक्झर्व्हेशन केले होते. त्यानंतर आवश्यकतेनुसार मुर्ती संवर्धन करणे अपेक्षित होते. पण कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे हे काम करणे अशक्य होते. त्यामुळेच तातडीने संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.

Related Stories

करमाळा तालुक्यासाठी 5 कोटी निधी मंजूर

Abhijeet Khandekar

इंदू मिलवरुन राजकारण करु नये : उध्दव ठाकरे

Tousif Mujawar

बिहारमध्ये राजकीय उलथापालथ! एमआयएमचे ४ आमदार RJD मध्ये

Archana Banage

कबनूरात दोन महिलांना कोरोना लागण एक मृत्यू

Archana Banage

Sangli; मणेराजूरीनजीक वारकऱ्यांना घेवून जाणारा टेम्पो उलटला, शिराळ्याचे वारकरी जखमी

Abhijeet Khandekar

स्वतःसाठी खोके तर शेतकऱ्यांना धोके देणारे हे सरकार आहे; आ. आदित्य ठाकरे

Archana Banage