Tarun Bharat

10 हजारांहून अधिक उंटांना मारले जाणार

कॅनबरा :

 दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या दुष्काळग्रस्त क्षेत्रातील पाण्याचा साठा वाचविण्यासाठी 10 हजारांहून अधिक जंगली उंटांना मारले जाणार आहे. अनंगु पीतजंतजतारा यनकुनितज्जतजरा लँडसच्या (एपीवाय) आदिवासींच्या नेत्याने पाण्याच्या अभावाला सामोरे जाणाऱया 10 हजार उंटांना मारण्याचा आदेश दिला आहे.

जंगलात वणवा भडकल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी घरांमध्ये शिरत असल्याची तक्रार लोकांनी केली आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतर आदिवासी नेत्यांनी 10 हजार उंटांना मारण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऊंट वर्षात 1 टन मिथेनचे उत्सर्जन करत असल्याने जागतिक तापमानवृद्धीवर प्रभाव दिसून येत असल्याचे म्हणत या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

ऊंट घरात शिरत असल्याने त्रास होऊ लागला आहे. हे ऊंट वातानुकुलन यंत्रणेतील पाणी पिण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा एपीवायच्या संचालक मंडळाचे सदस्य मारिया बेकर यांनी केला आहे. जंगली उंटांची संख्या दर 9 वर्षांनी दुप्पट होते. ऊंट अधिक पाणी पित असल्याने त्यांना मारण्याचा निर्णय घेतल्याचे ऑस्ट्रेलियाच्या ऊंट व्यवस्थापन यंत्रणेने म्हटले आहे.

Related Stories

C-17 विमानाच्या चाकांवर मानवी मृतदेहाचे अवशेष

datta jadhav

‘या’ कारणामुळे गूगलने घनी सरकारची ई-मेल अकाउंट केली लॉक

datta jadhav

इस्रायलसोबत संबंध प्रस्थापित करण्यास सौदी अरेबिया तयार

Amit Kulkarni

पाकिस्तानात विरोधकांवर सरकारकडून कारवाई

Patil_p

चार हजार रुपयांना मिळणार विदेशी लस

Patil_p

अमेरिकेत कोरोनामुळे दिवसात 2 हजार बळी

Patil_p