Tarun Bharat

10 हजार मीटर्समध्ये इथिओपियाचा बरेगा अजिंक्य

Advertisements

जेकब किप्लिमोला रौप्य तर चेप्तेगेईला कांस्यपदक, प्रचंड उष्णतेमुळे सर्वच प्रतिस्पर्ध्यांची दमछाक

इथिओपियाचा युवा धावपटू सेलेमॉन बरेगाने 10 हजार मीटर्सचे सुवर्ण जिंकत आश्चर्याचा धक्का दिला. ऍथलेटिक्समधील दिवसभरातील एकमेव पदकाच्या या इव्हेंटमध्ये बरेगाने 27 मिनिटे 43.22 सेकंद वेळेत अंतर पार केले आणि सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. 20 वर्षीय जेकब किप्लिमो रौप्य तर चेप्तेगेईने कांस्यपदक जिंकले.

या इव्हेंटमध्ये प्रचंड उष्णतेमुळे सर्वच प्रतिस्पर्ध्यांची दमछाक झाली. काही ऍथलिट तर फिनिशिंग लाईनवर पोहोचल्यानंतर अक्षरशः मैदानावर कोसळले. 30 डिग्रीपेक्षा अधिक तापमान असल्याने प्रतिस्पर्ध्यांसाठी हा इव्हेंट बराच खडतर ठरत गेला. असेच प्रतिकूल वातावरण कायम राहिले तर महिला गटात सिफना हस्सनला 10 हजार, 5 हजार व 1500 मीटर्स धावण्याच्या ट्रिपल इव्हेंटमधील आपली मक्तेदारी कायम राखण्यासाठी प्रयत्नांची बरीच पराकाष्ठा करावी लागेल, याचे हे संकेत आहेत. सध्या ती 5 हजार मीटर्सच्या फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरली आहे.

ऑलिम्पिकमध्ये नव्याने समाविष्ट केल्या गेलेल्या 4ƒ400 मिश्र रिलेमध्ये अमेरिकेचा संघ अपात्र ठरणे धक्कादायक ठरले. या संघातील ऍथलिटने बॉक्सच्या बाहेर बॅटॉन चेंज केली आणि याचा त्यांना फटका बसला. बरेच संघ ट्रक मार्किंगबद्दल देखील गोंधळलेले असल्याचे दिसून आले. शनिवारी झालेल्या फायनलमध्ये पोलंड, नेदरलँड, जमैका, ब्रिटन वेगवान क्वॉलिफायर्स ठरले.

Related Stories

सिनसिनॅटी स्पर्धेत फ्रान्सची गार्सिया विजेती

Patil_p

हॉकी प्रशिक्षक सोर्द मारिने यांची लेखनप्रपंचाकडे गरुडझेप!

Patil_p

आयपीएलमध्येही कोरोनाची एन्ट्री

Patil_p

वनडे फलंदाजांच्या मानांकनात कोहली, रोहित पहिल्या दोन स्थानावर

Patil_p

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा

Patil_p

मँचेस्टरमध्ये भारतीय संघ प्रशिक्षकांविना खेळणार

Patil_p
error: Content is protected !!