वृत्तसंस्था/ मुंबई
सकारात्मक कलाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार सध्या वेगाने वरचा स्तर गाठण्याचा प्रयत्न करतो आहे. शेअर बाजारात मागच्या आठवडय़ात 10 कंपन्यांनी 5 लाख 13 हजार 532 कोटी रुपये ओतले आहेत. यात बँकिंग क्षेत्रातील समभागांचा वाटा अधिक राहिला आहे.
मागच्या जोरदार व्यवहाराच्या आठवडय़ात बीएसई सेन्सेक्स 4445 अंकांच्या वाढीसह कार्यरत होता. शुक्रवारी सेन्सेक्सने 51 हजारचा स्तरही पार केला होता. एचडीएफसी बँकेने भांडवली बाजारात 1 लाख 13 हजार 516 कोटींची भर मागच्या आठवडय़ात घातली. यातून त्यांचे एकूण बाजार भांडवल 8 लाख 79 हजार 735 कोटी रुपयांचे झाले. स्टेट बँकेने दुसरीकडे 99 हजार कोटींची भांडवलात भर घातली होती. शुक्रवारी एसबीआयचे समभाग 11 टक्के चढले होते.
एचडीएफसीने 61 हजार 836 कोटी, आयसीआयसीआयने बँकेने 53 हजार 606 कोटींची भर घातली होती. कोटक महिंद्रा बँकेने 53 हजार 397 कोटींची तर बजाज फायनान्सने 48 हजार 375 कोटींची मागील आठवडय़ात भांडवलात भर घातली. यादीत क्रमवारीत आघाडीवर असणाऱया रिलायन्स इंडस्ट्रिजने 51 हजार 254 कोटींची भर घातली आहे.