मुंबई
शेअर बाजारात सेन्सेक्समधील 10 आघाडीवरच्या कंपन्यांचे बाजार भांडवल 2.72 लाख कोटी रुपयांनी मागच्या आठवडय़ात वाढल्याचे दिसले आहे. यात दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज भांडवल वाढीत आघाडीवर राहिली आहे. जागतिक बाजारातील तेजीचा लाभ भांडवल वाढीला झाला. मागच्या आठवडय़ात चारच दिवस व्यवहार झाले असताना बीएसई 30 समभागांचा सेन्सेक्स 2 हजार 300 अर्थात 4.16 टक्के इतका तेजीसह बंद होताना दिसला.