मुंबई
मागच्या आठवडय़ामध्ये शेअर बाजारामध्ये आघाडीवरच्या दहा कंपन्यांनी 3.3 लाख कोटी रुपये गमावले असल्याची बाब समोर आली आहे. मागच्या आठवडय़ामध्ये वरील कंपन्यांचे 3 लाख 33 हजार 307.62 कोटी रुपये बाजार भांडवल घटले आहे. बाजार भांडवलाचीही 7 महिन्यातील नीच्चांकी पातळी आहे. 2 कोटी 57 लाख 39 हजार 712 कोटी इतके सोमवारी बाजार भांडवल होते जे गुरुवारी घटून 2 कोटी 42 लाख 24 हजार 179 कोटी रुपयांवर आले आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे मागच्या आठवडय़ात शेअर बाजार 3 हजार अंकानी घसरला होता.