बेंगळूर
कोरोना महामारीने कंपन्यांनी कर्मचाऱयांनी आपल्या उद्योग, व्यवसायात कायम राहावे यासाठी नानाविध लुप्त्या लढवल्या आहेत. एका सर्व्हेमध्ये कोरोनाच्या निर्बंधामध्ये सवलत दिल्यानंतरच्या काळात 10 पैकी 6 कंपन्यांनी कर्मचाऱयांकरीता वर्क फ्रॉम होमची प्रणाली राबवली आहे. ही माहिती वित्त क्षेत्रातील कंपनी ग्रँट थॉर्नटन यांनी दिली आहे.
सदरच्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱयांना घरातून काम करण्यासाठी होकार दिला असून त्यांच्याकडून काम करवून घेण्यात यश मिळत असल्याची माहिती सर्व्हेत समोर आली आहे. कर्मचारीही घरी राहून तितक्याच क्षमतेने काम करत असल्याचे 10 पैकी 6 कंपन्यांनी म्हटले आहे.
याठिकाणी वर्क फ्रॉम नाही
यात्रा कंपन्या, आदरातिथ्य सेवा, उपचार केंद्रे आणि इतर आवश्यक सेवांसारख्या क्षेत्रांमध्ये मात्र काम प्रत्यक्ष उपस्थित राहूनच करावे लागते. याठिकाणी वर्क फ्रॉम होमची प्रणाली लागू पडत नाही.