प्रतिनिधी/ बेंगळूर
अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणाऱया महानगरपालिकांच्या महापौर आणि उपमहापौरपदाचे आरक्षण अखेर जाहीर करण्यात आले आहे. नगरविकास सचिवलयाने शुक्रवारी यासंबंधीचे आदेशपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार कार्यकाळ संपलेल्या राज्यातील 10 महानगरपालिकांच्या महापौर-उपमहापौरपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
आरक्षण खालीलप्रमाणे…
महापालिका महापौर उपमहापौर
बळ्ळारी सामान्य मागास महिला
बेळगाव सामान्य सामान्य महिला
दावणगेरे अनुसूचित जाती महिला सामान्य महिला
हुबळी-धारवाड मागास अनुसूचित जाती महिला
गुलबर्गा सामान्य महिला मागास
मंगळूर सामान्य मागास महिला
म्हैसूर सामान्य महिला मागास महिला
शिमोगा मागास महिला सामान्य
तुमकूर अनुसूचित जमाती सामान्य महिला
विजापूर अनुसूचित जाती मागास