जर तुम्हाला कुणी देशांची नावे आणि चलनाबद्दल विचारल्यास तुम्ही किती नावे सांगू शकाल? 10-20 हून अधिक नावे सर्वसाधारणपणे लोकांना आठवत नाहीत. पण एका 10 वर्षीय मुलीला जगातील 196 देश, त्यांची राजधानी आणि चलनाची नावेही तोंडपाठ आहेत. या मुलीची तल्लख स्मरणशक्ती आणि गुणवत्तेसमोर मोठे लोकही फिके पडत आहेत.
मूळची राजस्थानची असणारी मात्र सध्या दुबईत राहणारी सारा छीपा या मुलीने एक अनोखा विश्वविक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. जगभरातील तब्बल 196 देश, त्यांच्या राजधान्या आणि संबंधित देशांमध्ये वापरले जाणारे चलन या सर्व गोष्टी साराच्या तोंडपाठ आहेत. दुबईत ऑनलाईन स्वरुपात झालेल्या कार्यक्रमात सारा हिने हा विश्वविक्रम केला आहे. हा कार्यक्रम युटय़ूब, फेसबुक आणि लिंक्डइनवर थेट प्रसारित करण्यात आला. या शेणीत विक्रम नेंदविणारी सारा ही पहिलीच व्यक्ती ठरली आहे.
15 मिनिटांत 196 देश
सर्व देश आणि त्यांच्या राजधानींची नावे तोंडपाठ ठेवण्याचा विश्वविक्रम आतापर्यंत होता. मात्र साराने त्यापुढे एक पाऊल टाकत या सर्व देशांमधील चलनांच्या माहितीचाही स्वतःच्या विक्रमात समावेश केला आहे. देश आणि त्यांच्या राजधानी तसेच चलनांची नावे अशी एकूण 585 नावे तोंडपाठ करण्यासाठी सुरुवातीला साराला चक्क दीड ते दोन तास लागायचे पण तीन महिन्यांच्या सरावानंतर हा वेळ थेट 15 मिनिटांवर आला आहे.